श्रीरामपूर (अहिल्यानगर) – ‘मला १० सहस्र रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर अत्याचार करून पैसे वसूल करीन’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी तनजील गफार खान याला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात विवाहितेने तक्रार नोंद केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)
तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, अंगण स्वच्छ करत असतांना तनजील याने मला आणि नवर्याला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्यावर माझा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घरामध्ये नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या वेळी तनजील जातीवाचक बोलत ‘तुमची औकात नाही. तुम्ही भीक मागून खाणारे आहात’, असे बोलून ‘तुझ्यावर अत्याचार करून पैसे वसूल करीन’, अशी धमकी दिली.