प्रेमभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. हृषिकेश प्रसाद लेले (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !  चि. हृषिकेश प्रसाद लेले हा या पिढीतील एक आहे !

चि. हृषिकेश लेले
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

 – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नीटनेटकेपणा

‘हृषिकेशला नीटनेटकेपणाची पुष्कळ आवड आहे. घरामध्ये पसारा असेल, तर तो स्वतः आवरतो.

२. प्रेमभाव

एक दिवस त्याची आजी (सौ. भाग्यश्री लेले) दिवसभर काम करत होती. दिवसभर त्याचे लक्ष आजीकडेच होते. संध्याकाळी ती जरा पहुडली होती. त्या वेळी हृषिकेश त्याच्या चुलत भावाशी खेळत होता. ‘आजी झोपली आहे’, हे पाहून त्याने खेळ अर्धवट सोडला आणि तो आजीकडे गेला. त्याने आजीचे पाय आणि डोके चेपून दिले.

३. मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर असणे

त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि प्रेम आहे. प्रवास करत असतांना त्याला कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला, तर तो त्यांना नमस्कार करतो. ‘महाराजांविषयी कुठे काही नवीन माहिती मिळते का ?’, हे तो नेहमी शोधत असतो.

४. हिमालय आणि तेथील साधू-संत यांच्याविषयी कुतूहल असणे

त्याच्या मनात हिमालयाविषयी पुष्कळ कुतूहल आहे. तो सतत हिमालयात जाण्याविषयी बोलत असतो. ‘तेथे साधू-संत कसे रहातात ?’, याविषयी त्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे. तो सतत म्हणत असतो, ‘‘मला शंकरबाप्पाला बघायचे आहे.’’

५. साधनेची ओढ

अ. तो देवाला नमस्कार आणि जयघोष करूनच घराबाहेर पडतो.

आ. तो आम्हालाही नामजपादी उपाय आणि जयघोष यांची आठवण करून देतो.

इ. घरातून बाहेर पडतांना तो ‘नारायण, नारायण’, असे म्हणतो.

ई. तो देवाचे श्लोक म्हणून आणि ‘श्री योगेश्वरीदेव्यै नमः।’, हा नामजप करून अभ्यासाला आरंभ करतो.

६. हृषिकेशला आलेली अनुभूती

हृषिकेश श्री लिंगभैरवीदेवीच्या चित्राकडे पाहून त्राटक करतो. हे त्राटक तो सलग ३ – ४ मिनिटे करू शकतो. त्राटक करतांना प्रथम त्याला देवीच्या चित्रामागे पांढरा प्रकाश दिसतो. काही वेळाने देवीचे चित्र दिसेनासे होऊन त्याला केवळ पांढरा प्रकाश दिसतो.

‘असा प्रेमळ, शांत स्वभावाचा आणि इतरांचा विचार करणारा गुणी मुलगा आम्हाला दिला’, याबद्दल आम्ही ईश्वर अन् गुरुदेव यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहोत.’

– श्री. प्रसाद नरसिंह लेले आणि सौ. सायली प्रसाद लेले (कु. हृषिकेश याचे वडील आणि आई), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (११.४.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.