उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. स्पृहा बंगाळ ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. स्पृहा बंगाळ महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.५.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) हिची तिची आई सौ. कल्याणी बंगाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. घरकामात साहाय्य करणे
‘स्पृहा मला घरकामात साहाय्य करते. मला बरे नसल्यास माझी काळजी घेते आणि तिचा लहान भाऊ ‘श्वेत’ याला सांभाळते.
२. धर्माचरणाची आवड असणे
ती प्रतिदिन संध्याकाळी तुळशीपुढे आणि देवापुढे दिवा लावणे, प्रार्थना करणे, कृतज्ञता करणे, रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणणे, कुलदेवीचा नामजप करणे, असे नित्यनियमाने करत आहे.
३. गुरूंप्रती भाव
स्पृहाचा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अनन्यसाधरण भाव आहे. तिला काही त्रास होत असल्यास किंवा झोप लागत नसल्यास ती गुरुदेवांच्या साधनाविषयक मार्गदर्शनाची ध्वनीफीत ऐकते. ‘ते ऐकल्याने तिला पुष्कळ चांगले वाटते’, असे तिने सांगितले.
४. आश्रम पाहून भावजागृती होणे
काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या साधक नातेवाइकांना रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी घेऊन गेलो. तेव्हा आश्रम दाखवणार्या साधकाने काही प्रयोग करायला सांगितले. तेव्हा स्पृहाला विविध अनुभूती आल्या आणि तिची पुष्कळ भावजागृती झाली.
५. झालेले पालट
५ अ. चिडचिड उणावून समंजसपणा वाढणे : ‘स्पृहामध्ये असणारा चिडचिडेपणा हा स्वभावदोष पूर्वीपेक्षा अल्प झाल्याचे जाणवते. ‘ती आता समंजस झाली आहे’, असेही जाणवते.
५ आ. साधनेप्रती गांभीर्य वाढणे : स्पृहाची साधनेप्रती ओढ वाढली आहे. ब्रह्मोत्सवानिमित्त काही साधक आमच्या घरी आल्यावर ती त्यांनी सांगितलेले प्रयत्न करू लागली आहे. तिने अनिष्ट शक्तीमुळे आलेले त्रासदायक आवरण काढणे, प्रार्थना करणे, कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी प्रयत्न करायला आरंभ केला आहे.
– सौ कल्याणी बंगाळ (कु. स्पृहाची आई), बोरी, फोंडा, गोवा. (१०.३.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.