Amethi Muslims : भारतात रहायचे असेल, तर ‘हुसेन’ म्हणावेच लागेल ! – मुसलमानांनी दिल्या घोषणा !

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे पोलीस ठाण्यासमोर मुसलमानांनी दिल्या घोषणा !

(शिया मुसलमान महंमद पैगंबर यांचा नातू इमाम हुसेन यांना आदर्श मानतात)

घोषणा देताना मुसलमान तरुण

अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठी जिल्ह्यातील मुसाफिरखाना या तालुक्याच्या शहरात मुसलमानांनी १४ जुलैच्या सायंकाळी मोहरमपूर्वी (शिया मुसलमानांचा सण) मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मुसाफिरखाना पोलीस ठाण्यासमोर आली असता मिरवणुकीत सहभागी मुसलमानांनी ‘भारतात रहायचे असेल, तर हुसेन म्हणावेच लागेल’ अशी घोषणा दिली. ही घोषणा सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. (पोलीस ठाण्यासमोरच अशा घोषणा दिल्या जात असतांना पोलीस झोपले होते कि ठार बहिरे होते ? सामाजिक माध्यमांत व्हिडिओ प्रसारित झाला नसता, तर पोलिसांनी गुन्हाही नोंदवला नसता आणि धर्मांध मुसलमानांनी त्यांचा हेतू साध्य करण्याचे प्रयत्न चालू ठेवले असते ! अशा निष्क्रीय पोलिसांवर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

१. स्वामी परमहंस आश्रम सागर बाबूगंजचे प्रमुख मौनीजी महाराज म्हणाले की, पोलीस ठाण्यासमोर अशी आक्षेपार्ह घोषणा दिल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करतो, जेणेकरून अशा घटकांना रोखता येईल. अशा घटकांची मुळे पाकिस्तानपर्यंत पोचली आहेत. या लोकांना भारतात धार्मिक दंगली घडवायच्या आहेत आणि येथील ‘गंगा-जमुनी संस्कृती’ (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) नष्ट करायची आहे. (मुळात अशी काही संस्कृतीच नाही. ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंचा आत्मघात करण्यासाठी रचलेले हे एक कुभांड आहे आणि त्याला हिंदूंचे धार्मिक नेतेही बळी पडत आहेत, हे दुर्दैव आहे ! – संपादक) त्यामुळे अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी. यामागे राजकीय षड्यंत्रही असू शकते.

२. यासंदर्भात पोलीस अधीक्षक अनुप कुमार सिंह यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणार्‍या लोकांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून व्हिडिओचीही तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

  • धर्माच्या आधारे भारताची फाळणी करून मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले; तरीही जे मुसलमान भारतात राहिले ते थेट पोलीस ठाण्यासमोरच भारतातील हिंदूंनाच धमकी देऊन त्यांची मानसिकता काय आहे ?, हे पुन्हा दाखवून देत आहेत. आत्मघाती धर्मनिरपेक्षतेत गुंग असणारे हिंदू आतातरी जागे होणार आहेत का ?
  • अमेठीमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे याविरोधात काँग्रेसने एकही शब्द काढलेला नाही. यातून काँग्रेस कुणामुळे निवडून येत आहे, हे लक्षात येते !