संबंधितांना २९ जुलै या दिवशी म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी

झाडाणी (तालुका महाबळेश्वर) भूमी गैरव्यवहार प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १४ जुलै (वार्ता.) – ‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेअंतर्गत झाडाणी भूमी गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये याविषयी खडाजंगी झाली. ११ जुलै या दिवशी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. या वेळी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांचे नातेवाईक सुनावणीसाठी उपस्थित होते. वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे सादर केली. उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली. अपर जिल्हाधिकारी यांनी २९ जुलै या दिवशी म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी आयुक्त वळवी यांना दिली आहे.