मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, अन्य विभाग, तसेच विभागाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण ‘इ-ऑफिस प्रणाली’द्वारे करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. ‘इ-ऑफिसप्रणाली’साठी लागणार्या मंत्र्यांच्या स्वाक्षर्याही डिजीटल पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही विभागाने प्रत्यक्ष कागदपत्रे स्वीकारू नयेत, अशा स्पष्ट सूचना शासन आदेशात देण्यात आले आहेत. १ एप्रिल २०२३ या दिवशी मंत्रालयातील कागदपत्रांची देवाण-घेवाण ‘ई ऑफिसप्रणाली’द्वारे करण्याचा आदेश शासनाने काढला होता. याविषयी पुन्हा शासन आदेश काढून कार्यवाही प्रभावीपणे करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आली आहे.