तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलंबित !

एन्.के. पाटील

तळेगाव – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांना निलंबित केल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी काढला. पाटील यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाचा भंग केला. त्यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, नगर परिषदेतील कर्मचारी, तसेच अनेक सामाजिक संस्थेतील पदाधिकार्‍यांनी शासनाकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. वाढत्या तक्रारींमुळे पाटील यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुदतपूर्व स्थलांतरही करण्यात आले होते; मात्र पाटील यांनी या स्थलांतराला आव्हान देत आठवड्याभरातच ते पुन्हा रुजू झाले होते. पाटील हे त्यांच्या कर्तव्यांच्या संदर्भात उदासीन असल्याने शहरातील आरोग्य, पाणी, स्वच्छता, तसेच इतर नागरी मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला होता. (भ्रष्ट आणि अकार्यक्षम मुख्याधिकार्‍याला निलंबित करण्यासाठी तक्रारी का कराव्या लागल्या ? त्यांची पाठराखण करण्यामध्ये कुणा अधिकार्‍याचे हित जपले होते का ? हे शोधून काढायला हवे. – संपादक)