बगदाद (इराक) – इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचा ठार झालेला प्रमुख अबू बकर अल्-बगदादी याच्या पहिल्या पत्नीला इराकच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आतंकवादी संघटनेसमवेत काम करणे आणि यझिदी महिलांचे अपहरण करणे, यांमुळे तिला दोषी ठरवण्यात आले. अस्मा महंमद उम्म हुधायफा असे तिचे नाव आहे.
ISIS leader Abu Bakr al-Baghdadi’s wife, Asma Mohammed, sentenced to death for ‘crimes against humanity & genocide’ by Iraqi Criminal Court
Accused of working with ISIS group & detaining Yazidi women
Even terrorists do not get death penalty in India!pic.twitter.com/fPcwSxkbUn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2024
इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांकडून झालेले अपहरण आणि बलात्काराला बळी पडलेल्या यझिदी महिलांनी इराकमध्ये दिवाणी खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. यात म्हटले हाते की, अस्मा मुली आणि महिला यांचे अपहरण करून त्यांना लैंगिक गुलामगिरीत ढकलण्याच्या कृत्यात सहभागी आहे. अस्माने हे आरोप फेटाळून लावले होते.
संपादकीय भूमिकाभारतात आतंकवाद्यांनाही फाशीची शिक्षा होत नाही ! |