हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदन
पुणे, ८ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व (खासदारकी) तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी स्वीकारले.
या प्रसंगी सर्वश्री सुरेंद्र महाजन, विवेक कद्रिवेल, सचिन घुले, अनिल डोणवाडे, आकाश जाधव, अनिल माने, रोहन वेलकर आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.