पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचे प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसाचारी म्हटल्यावरून उडुपी येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी (पेजावर स्वामी) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरून काँग्रेसने त्याच्या अधिकृत खात्यावरून पेजावर स्वामींवर अश्लाघ्य स्वरूपात टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले की, आम्हाला स्वामीजींविषयी आदर आहे; परंतु राजकीय विषयात नाक खुपसणे आणि काँग्रेस नेत्यांवर अनावश्यक टीका करणे, हे त्यांच्या स्थानाला शोभा देत नाही. पेजावर स्वामीजी संपूर्ण हिंदु समाजाचे प्रतिनिधी नाहीत.
Pejavar Swami should not interfere in political matters: Congress
Case of Shri Vishwaprasanna Tirtha Swamiji of Pejawar Muth criticising Rahul Gandhi
Hindus should tell Congress, which is riddled with Hindu hatred, that it has no right to talk about Hindus… pic.twitter.com/4Ihk7NlnTL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2024
काँग्रेसने पुढे म्हटले की, हिंदु धर्माचा ठेका भाजप अथवा रा.स्व.संघ यांना देण्यात आलेला नाही. भाजप म्हणजे संपूर्ण हिंदु समाज नव्हे. (हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या काँग्रेसला हिंदूंविषयी बोलण्याचा अधिकार नाही, हे हिंदूंनी तिला ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक) स्वामीजींनी राजकारणात रुची दाखवण्यापेक्षा सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. (स्वत: समाजविघातक वक्तव्ये करून समाजमन कलुषित करायचे आणि वर हिंदु संतांनी काय केले पाहिजे, असे उपदेशाचे डोस पाजायचे ? अशा काँग्रेसच्या पाठीशी संपूर्ण हिंदुविरोधी जग असले, तरी तिला सत्ता प्राप्त होऊ शकली नाही, यातच सर्वकाही आले ! – संपादक)
काय म्हणाले होते पेजावर स्वामीजी ?
कर्नाटकच्या विजयपूर येथे बोलतांना पेजावर स्वामीजी म्हणाले होते की, सहिष्णु असलेल्यांना छेडणे आणि सहिष्णुता भंग करणे, याची काही जणांना सवय आहे. सहिष्णु असलेल्यांना छेडून गोंधळ निर्माण करायचा आणि त्यात आपली डाळ शिजवून घ्यायची, असा त्यांचा दुष्ट हेतू असतो.
संपादकीय भूमिका
|