महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने !

महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली

मुंबई – राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ५ जुलै या दिवशी विधान भवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.