ज्योतिबा देवस्थानासाठी प्राधिकरणाची स्थापना ! – महायुती सरकारचा निर्णय

अजित पवार

मुंबई – श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा सिद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय ५ जुलै महायुती सरकारने घेतला.  अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, ‘‘जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील संतांचे मोठे गुरुबंधू मानले जातात. त्यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा सिद्ध करून त्याला आवश्यक निधी देण्यात येणार आहे.’’