सेवेची तळमळ असलेला मिरज (जिल्हा सांगली) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अवधूत संजय जगताप (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अवधूत जगताप हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२३ मध्ये कु. अवधूत याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती.’ – संकलक)

ज्येष्ठ कृष्ण द्वादशी (३.७.२०२४) या दिवशी मिरज (जिल्हा सांगली) येथील कु. अवधूत संजय जगताप याचा ११ वा वाढदिवस आहे. मे २०२४ मध्ये तो देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आला होता. तेव्हा आश्रमातील सौ. मीना खळतकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. अवधूत जगताप
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. अवधूत संजय जगताप याला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

सौ. मीना खळतकर

१. ‘कु. अवधूत प्रत्येक सेवा नीटनेटकेपणाने, स्थिरतेने, भावपूर्ण आणि परिपूर्ण करतो. त्याने केलेली कृती ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, अशी असते.

२. सेवेची तळमळ

एकदा अवधूत बालसाधकांच्या समवेत आश्रमातील प्रांगणात खेळत होता. त्याच्या सेवेची वेळ झाल्यावर तो खेळ सोडून सेवा करण्यासाठी जाण्यास निघाला. तेव्हा अन्य बालसाधक त्याला म्हणाले, ‘‘तू करत असलेली सेवा पूर्ण झाली आहे.’’ तेव्हा अवधूत सेवेच्या ठिकाणी गेला आणि त्याने ‘तो करत असलेली सेवा पूर्ण झाली आहे कि नाही ?’, याची निश्चिती केली.

३. आज्ञापालन

तो एका वयस्कर आजींची जेवणाची भांडी घासतो आणि घासलेली भांडी एका ठरलेल्या जागी ठेवतो. मी त्याला सांगितले, ‘‘त्या भांड्यांच्या समवेत आजींचा थर्मासही ठेवत जा.’’ तेव्हापासून त्याने हे सूत्र तंतोतंत पाळले. त्याला त्याविषयी पुन्हा सांगावे लागले नाही.’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.