‘नीट’च्या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित
नवी देहली – राष्ट्रीय चाचणी यंत्रणेने (एन्.टी.ए.ने) ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)’च्या घेतलेल्या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सवलतीचे गुण मिळालेल्या १ सहस्र ५६३ उमेदवारांसाठी ही पुनर्परीक्षा घेण्यात आली होती; मात्र त्यात केवळ ८१३ जण सहभागी झाले. निकालासमवेतच नवीन गुणवत्ता सूचीही आली आहे. यामध्ये सर्वोच्च गुण मिळवणार्यांची संख्या अल्प झाली आहे. जुन्या सूचीमध्ये ही संख्या ६७ होती आता ती ६१ झाली. तसेच मागील परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळालेल्या ६ पैकी ५ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. या वेळी मात्र यातील कुणालाही ७२० गुण मिळालेले नाहीत.