मुंबई, २९ जून (वार्ता.) – ‘‘जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सरकारने दिनांकानुसार न करता तिथीनुसार साजरी करावी’, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
Jitendra Awhad opposes celebrating the birth anniversaries of National leaders according to the traditional lunar calendar!
Opposes statement by Sudhir Mungantiwar in this regard. pic.twitter.com/VUepJ0pHa7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 29, 2024
सुधीर मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का ? सरकारला तिथीनुसार जयंती का साजरी करायची आहे ? असे बोलण्यामागे त्यांचा काय हेतू आहे ? याला बहुजन विरोध करतील. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी दिनांकानुसार राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी करण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्यात दिनांकानुसारच जयंती साजरी करावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २९ जून या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.