‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.

डावीकडून उदयपूर, राजस्थान येथील श्रीकुलम् आश्रमाच्या संस्थापिका पू. मां भुवनेश्वरी पुरी, श्रीकुलम् आश्रमाच्या सहसाधिका श्रीमती कैलाश कुँवर जौनपूर, उत्तरप्रदेश येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. इंद्रसेन सिंह, हरिद्वार येथील संवित गंगायन ट्रस्टचे महंत आणि व्यवस्थापकीय विश्वस्त स्वामी समानंदगिरी यांना आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना साधिका सौ. अरुणा सिंह
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील काशी विश्वेश्वर मंदिर मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणारे धर्मप्रेमी डावीकडून अधिवक्ता दीपक कुमार सिंह, श्री. सोहन लाल आर्य, श्री. बाल गोपाल साहू, सौ. सीता साहू आणि अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी यांना सूक्ष्म जगताविषयीच्या अद्वितीय संग्रहालयाची माहिती सांगतांना साधक श्री. गोपाल कृष्ण मुदलियार
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.