श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या, २८ जून या दिवशी काश्मीरमध्ये पोचणार आहे. येथून हे यात्रेकरू बालताल आणि अनंतनाग तळांवर जातील. यानंतर सर्व यात्रेकरू सुरक्षा ताफ्यासह मार्गस्थ होतील. अमरनाथ यात्रेसाठी थेट नोंदणीला प्रारंभ झाला आहे.