मतदान केंद्राच्या बाहेर पैशांची पाकिटे वाटणार्‍याला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघाच्या बाहेर पैशांची पाकिटे वाटण्याचा प्रकार घडला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव आहे. ५३ पाकिटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत. ही पाकिटे वाटप करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.