निरंजन डावखरे तिसर्‍यांदा विजयी होऊन विक्रम करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन  

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक


रत्नागिरी – कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे आमदार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत द्या. ते सलग तिसर्‍यांदा विजयी होऊन विक्रम करणार आहेत, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. श्री. डावखरे यांनी ग्रीन स्कूलचा संकल्प घोषित केला. डावखरे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद लाभला असून रत्नागिरीत चांगले मताधिक्य प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

अधिवक्ता दीपक पटवर्धन म्हणाले की, पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठी ई-लायब्ररीही लवकरच चालू होणार आहेत.