हिंदूंनो, लढाऊ वृत्ती जोपासा !

लव्ह जिहाद, भूमी जिहाद, दंगली, गोहत्या आदी करणार्‍या जिहादी वृत्तीच्या आक्रमक धर्मांधांना विरोध करण्यासाठी हिंदू  जागृत झाले पाहिजेत. त्यांच्यातील भीती गेली पाहिजे. जागृत झालेला एखाद-दुसरा हिंदु संघटित समुदायासमोर कृती करण्यास पुरा पडत नाही. त्याचीच जीवितहानी होते. एकटेपणामुळे अशा अनेक जागृत लढवय्या हिंदूंना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत; पण तरीही बाकीच्या हिंदूंना अजून जाग आल्याचे दिसत नाही. आतापर्यंत अनेक संतांनी आणि लढवय्या हिंदूंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले आहेत. संतांनी धर्माचरणाची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी एवढा मोठा लढा उभारला. त्याद्वारे हिंदूंधील लढाऊ वृत्ती जागृत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर काही काळ मराठ्यांमधील लढाऊ वृत्ती जागृत राहिली होती. त्यामुळेच ते अटकेपार झेंडे फडकवू शकले; परंतु त्यानंतर ती लढाऊ वृत्ती हळूहळू लोप पावत गेली.

हिंदूंच्या असंघटितपणाचा आणि सहिष्णू वृत्तीचा इंग्रजांनीही मोठा लाभ उठवला. येथील वेगवेगळ्या अनेक संस्थानिकांना आमिषे दाखवून त्यांना एकमेकांमध्ये लढायला लावले. संस्थानिकांना सत्तेवरून दूर केले. त्यांचे राज्य स्वतः चालवायला घेतले. अशा प्रकारे इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यांच्यातील बुद्धी आणि संघटितपणा यांमुळे ते संख्येने थोडे असले, तरी अनेक वर्षे त्यांनी येथील हिंदूंवर राज्य केले. येथील अफाट लोकसंख्येवर नियंत्रण मिळवले. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक हिंदूंनी प्रयत्न केले. त्यांच्या जिवाचे मोल दिले. अनेकांना संघटित केले. यामध्ये सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक यांसारखे मोठे नेते होते. त्यांनी समाजामध्ये जागृती केली. सैनिकांनी संघटितपणे इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे इंग्रजांना भारत सोडून जावे लागले.

हिंदु त्यांची लढाऊ वृत्ती विसरले आहेत. भगवान परशुराम यांनी २१ वेळा पृथ्वी निशस्त्र केली होती, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती आता जागृत करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक हिंदूला आता सांगायला हवे, ‘जागा हो नाही, तर मरणाला सिद्ध हो.’ बहुसंख्य हिंदु मनाने आणि शरिराने पंगू झाले आहेत. त्यांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून दिली पाहिजे. ती जागृत झाल्यावर तिचा योग्य वापर करायला पाहिजे, हेही त्यांना सांगितले पाहिजे. पृथ्वीराज चौहान यांनी जसे घोरीला अनेक वेळा पराभूत करूनही त्याला जीवदान दिले. शेवटी तोच त्यांच्या जिवावर उठला आणि त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना ठार मारले. याचा अर्थ हिंदूंमध्ये असलेला अतीउदारपणा, सहिष्णूवृत्ती ही शत्रूपुढे काही उपयोगाची नाही. विनाकारण अंगावर येणार्‍या दुष्प्रवृत्तींना रोखायला हवे ! हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची लढाऊ वृत्ती सतत जागृत ठेवली पाहिजे !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.