शेतकरी महिला बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

प्रतिकात्मक चित्र

वर्धा, २२ जून (वार्ता.) – येथील आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी महिला बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष शरद कांबळे यांनी ‘मे २०२४ पर्यंत सर्व ठेवीदारांची रक्कम परत करू’, असे ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले; मात्र कुणाचीही ठेवी रक्कम परत दिली नाही. यामुळे सर्व ठेवीधारकांनी आमदारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (अशा आर्थिक घोटाळ्यांवर सरकारने नियंत्रण आणायला हवे ! – संपादक)