विश्वाचा आधार, कृपेचा सागर ।

रायंगिणी, बांदोडा, गोवा येथील श्री. दीपक रामचंद्र छत्रे यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाविषयी सुचलेले काव्य येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्वाचा आधार, कृपेचा सागर ।
दयाघन करुणाकर श्री जयंत (टीप) मायबाप ।। १ ।।

श्री. दीपक छत्रे

साधकाचा तारणहार, तो जगदीश्वर ।
कालनियमानुसार ‘आठवले’ कुळी जन्मला ।। २ ।।

उपचार करी मनोरुग्णांवर, शिष्योत्तम बनला लवकर ।
साधनेचा करी प्रसार गुर्वाज्ञा म्हणोनी ।। ३ ।।

महिमा ज्याचा अपार, गाती मुनि-सुरवर ।
व्यापून राहिला चराचर रामनाथीत स्थूलरूपे ।। ४ ।।

सर्वात्मक सर्वेश्वर, तो रामराज्य आणणार ।
सहभागी होऊ सत्वर शरण त्यास जाऊनी ।। ५ ।।

मतिमंद हा पामर, स्तवन कसे करणार ।
अर्पितो तव चरणांवर शब्द जे सापडले ।। ६ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, बांदोडा, गोवा. (२०.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक