Israel Protest : इस्रायली आंदोलकांकडून गाझामधील ओलिसांच्या सुटकेची मागणी !

तेल अविव – गाझा प्रदेशात अद्यापही ओलीस असलेल्या इस्रयली नागरिकांच्या सुटकेच्या मागणीसाठी येथे १७ जून या दिवशी सहस्रो इस्रायलींनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या ओलिसांना मायदेशी परत घेऊन येण्यासाठी युद्धबंदी करण्याचीही मागणी त्यांनी केली. या वेळी आंदोलकांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर त्यांना हमास आतंकवाद्यांविरुद्धचे युद्ध हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप केला.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी २५१ इस्रायलींना बंधक बनवले होते. त्यांपैकी ११६ जण अजूनही हमासच्या कह्यात असल्याचा इस्रायलचा दावा आहे.