Delhi Metro : देहली मेट्रो स्वयंचलित करणार !

देहली – शहरातील मेट्रो चालकाविना, म्हणजेच स्वयंचलित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जून महिन्याच्या शेवटपर्यंत देहलीतील मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित करणार असल्याचे ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून सांगण्यात आले. शहरातील १६ मेट्रोंमधून चालकाची ‘कॅबिन’ काढले जाणार आहे. यामुळे मेट्रोमधील प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे मानवी चुका टळतात. ट्रेनचे संचालन करणे सोपे असते. देहलीतील मेट्रोनंतर हा पर्याय मुंबई आणि पुणे येथील मेट्रोंमध्येही वापरण्यात येणार आहे. देहलीतील मेट्रोंमध्ये समन्वयासाठी तैनात करण्यात आलेले ‘अटँडेंट’ टप्प्याटप्प्याने न्यून करण्यात येणार आहेत. यापुढे ३-४ ट्रेन मिळून एक अटँडेंट ठेवण्यात येणार आहे.