सनातनच्या अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करण्यास साहाय्य करा !

सनातनचे हितचिंतक आणि वाचक यांना विनंती अन् साधकांना सूचना !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘मी वर्ष १९९० पासून अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करत आहे. ग्रंथांसाठी मला आणि सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ईश्वरी ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचे असले, तरी ग्रंथवाचनाने वाचकांच्या ज्ञानात अजून भर पडावी, म्हणून मी इतर लेखकांचे आध्यात्मिक ग्रंथ आणि नियतकालिके यांतील ज्ञानही माझ्या ग्रंथांत घेतो.

‘अध्यात्म’ हा अनंताचा विषय आहे. गेल्या काही वर्षांत ‘वाचकांना मी लिहिलेल्या ग्रंथांतील विषय सविस्तर समजावा आणि साधकांचा निरनिराळ्या विषयांवरील अन्य ग्रंथ वाचण्यातील वेळ वाचावा’, यांसाठी मी ८ सहस्रांहून अधिक निरनिराळे ग्रंथ आणि नियतकालिके यांच्या प्रती वाचून त्यांतील महत्त्वाच्या मजकुराला खुणा केल्या आहेत अन् अशा प्रकारे अजूनही खुणा करत आहे. खुणा केलेला मजकूर संकलन करणे बाकी आहे. तो मजकूर सनातनच्या ग्रंथांत घेण्यासाठी मी त्या मजकुरावर ‘सनातनच्या ग्रंथाचे नाव’ लिहितो. त्यामुळे खुणा केलेला मजकूर सनातनच्या प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या पुढच्या आवृत्तीत त्या त्या ठिकाणी जोडता येतो.

आता आपत्काळ, म्हणजे तिसरे महायुद्ध जवळ येत आहे. पुढे युद्धकाळात हे कार्य करणे अशक्य होईल आणि महायुद्धानंतर ‘खुणा केलेले किती ग्रंथ सुरक्षित रहातील ?’, हे आपल्याला ज्ञात नाही. त्यामुळे हे ग्रंथ नष्ट होण्याआधी पुढील सेवा पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

१. टंकलिखित मजकुराचे व्याकरण पडताळून त्याला ग्रंथ-संकलनाच्या दृष्टीने मथळे देणे

२. ‘निवडलेला मजकूर कोणकोणत्या ग्रंथांत घ्यावयाचा ?’, हेही ठरवणे, उदा. ‘देवतेची भक्ती’ हा मजकूर ‘देवता’ आणि ‘भक्तीयोग’ या दोन्ही ग्रंथांत घेता येतो.

३. मजकुराला सनातनच्या छापील ग्रंथाप्रमाणे क्रमांक देणे, म्हणजे ‘मजकूर संबंधित ग्रंथातील कोणत्या प्रकरणात आणि कुठे जोडायचा ?’, हे ठरवणे.

ज्या साधकांना हा विषय नवीन असल्यामुळे शिकणे आवश्यक आहे, ते रामनाथी आश्रमात येऊन काही आठवडे राहून शिकू शकतात. पुढे ज्या साधकांना वाटेल की, आपण आश्रमातच राहून ही सेवा करावी, त्यांनी त्याचाही अवश्य विचार करावा. आश्रमात रहाणे शक्य नसणारे साधक वरील सेवा शिकून पुढे ती घरी राहूनही करू शकतात.

सेवेसाठी हा नवीन प्रकार उपलब्ध झाला म्हणून आनंद झालेल्या साधकांनी आपली माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी. त्यांच्याकडे ही सेवा पाठवण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया त्वरित केली जाईल.

संपर्क क्रमांक : ८१८०९६८६४०, (०८३२) २३१२६६४ 

ई-मेल : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले