बकरी ईदच्या निमित्त बोलावलेल्या शांतता सभेत मुसलमानांच्या दोन गटांत मारामारी !

प्रतिनिधिक छायाचित्र

कोप्पळ (कर्नाटक) – बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती येथे शांतता सभा बोलावली होती. या सभेत विद्यमान आमदार गाली जनार्दन रेड्डी यांच्या जवळचा मित्र अली खान बोलायला पुढे येताच माजी आमदार इक्बाल अन्सारी यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

जनार्दन रेड्डी आणि इक्बाल अन्सारी यांनी गेल्या विधानसभा अन् लोकसभा निवडणुकीच्या वेळी परस्परांवर जोरदार टीका केली होती. दोघा नेत्यांच्या समर्थकांमध्ये वैमनस्य होते.