कोटी कामे सोडून हरिस्मरण करावे

‘जगातील मोठमोठ्या उद्योगांपेक्षा क्षणभर आत्मा-परमात्म्यामध्ये स्थित होणे, अनंतपटीने हितकारी आहे.

शतं विहाय भोक्तव्यं सहस्त्रं स्नानमाचरेत् ।
लक्षं विहाय दातव्यं कोटिं त्यक्त्वा हरिं स्मरेत् ।।

अर्थ : शंभर कामे सोडून भोजन करावे, सहस्र कामे सोडून स्नान करावे, लाख कामे सोडून दान करावे आणि कोटी कामे सोडून हरिस्मरण करावे.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)