हिंदु संत आणि संप्रदाय यांची अपकीर्ती करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तात्काळ बंदी घाला !

कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी !

आंदोलनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १३ जून (वार्ता.) – अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान आणि ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधू-संतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकिर्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केले.

या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. अवधूत चौगुले आणि श्री. नितीन चव्हाण, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. रणजित जाधव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, अमेय भालकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि कु. प्रतिभा तावरे उपस्थित होत्या.