भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

प्रपंचातील विघ्ने ही सूचनावजा असतात, ती आपल्याला जागे करतात. ‘आपण जन्माला आलो, ते भगवंताला ओळखण्याकरता’, हे विसरू नये; म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. व्यवहारात द्वैताविना आनंद नाही. म्हणून परमार्थात, मानसपूजेत पहिल्यांदा ‘मी’ आणि ‘परमात्मा’ अशा द्वैताने प्रारंभ करावा लागतो.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)