Ramoji Rao Passes Away : ‘रामोजी फिल्मसिटी’चे संस्थापक रामोजी राव यांचे निधन !

‘रामोजी फिल्मसिटी’चे संस्थापक रामोजी राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘रामोजी फिल्मसिटी’चे संस्थापक रामोजी राव (वय ८७ वर्षे) यांचे उपचार चालू असतांना ८ जूनला पहाटे निधन झाले. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना भाग्यनगरमधील ‘स्टार’ रुग्णालयात ५ जून या दिवशी भरती करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक !

रामोजी राव यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की, रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. सहवेदना’, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.