बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस !

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस

बेळगाव – बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकामंदिर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने या परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. हे पाणी रेणुकामंदिरातही शिरले होते. मंदिर परिसरातील दुकाने आणि घरे यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. गावातही असलेल्या लहान-लहान ओढ्यांनाही पूर आल्यासारखी स्थिती होती. व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने त्यांनी अतीवृष्टीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.