एक काळ होता तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा ! बाल शिवाजी पुण्यामध्ये असतांना एक कसाई गायीला फरफटत घेऊन जात असतांना त्यांनी पाहिले. गायीला ठार करण्यासाठी घेऊन जात असल्याचे कळल्यावर बाल शिवबाने तात्काळ स्वत:च्या तलवारीने कसायाचे हात तोडले आणि गायीची सुटका केली. ते हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचे पहिले गोरक्षण होते आणि हिंदवी स्वराज्याची तोंडओळख होती. मोगलांच्या राज्यात एका सरदाराच्या मुलाने कसायाचे हात तोडणे हा तर मोगलांच्या लेखी तसा पुष्कळ मोठा गुन्हा होता; मात्र मोगल शासकांनाही बाल शिवबावर कारवाई करण्याचे तेव्हाही धैर्य झाले नाही. अशी धमक असलेल्या शिवाजी महाराजांना पुढे ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही उपाधी मिळाली.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद. (दैनिक सनातन प्रभात, २५.७.२०१७)