उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. पूजा महेश सोलंकी ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. पूजा महेश सोलंकी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.५.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
ठाणे येथील कु. पूजा महेश सोलंकी हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. उत्तम बुद्धीमत्ता
‘कु. पूजाची बुद्धी चांगली आहे. ती कुठल्याही शिकवणीला न जाताही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते. ‘अभ्यास करणे, पाठांतर करणे, प्रकल्प करणे’, हे सर्व ती स्वतःच पूर्ण करते. तिच्या शाळेतील शिक्षक तिचे कौतुक करतात. तिचे शिक्षक मला सांगतात, ‘‘पूजाला कुठलेही काम सांगितले, तरी ती ते व्यवस्थित पूर्ण करते. तिचे हस्ताक्षरही फार सुंदर आहे.’’
२. समंजस
पूजाला हवी असलेली एखादी गोष्ट मिळाली नाही, तरी ती शांत रहाते.
३. इतरांशी जुळवून घेणे
पूजा एकदा ठाणे सेवाकेंद्रात गेली होती. तेव्हा तिकडच्या साधकांमध्ये मिसळून तिने सेवाही केली होती.
४. प्रेमळ
ती लहान मुलांवर पुष्कळ प्रेम करते. ती तिच्या मावसभावाला प्रेमाने सांभाळते. तिचे तिच्या मैत्रिणींवरही प्रेम आहे. आमचे नातेवाईक म्हणतात, ‘मी जेवढी पूजाची काळजी घेत नाही, तेवढी पूजा माझी काळजी घेते.’
५. घरकामात साहाय्य करणे
कोरोना महामारीच्या काळात पूजा केवळ ८ वर्षांची होती. तेव्हा तिने संकेतस्थळावरून स्वयंपाकाची माहिती घेतली होती. पूजा मला घरकाम आणि स्वयंपाक यांत साहाय्य करते.
६. भाव
पूजाच्या मनात परम पूज्यांविषयी पुष्कळ भाव आहे. परम पूज्यांनी तिला दिलेल्या चॉकलेटचे वेष्टन तिने सांभाळून ठेवले आहे. तिची परम पूज्यांना भेटण्याची नेहमी इच्छा असते. तिचे गुरुस्मरण नियमित होत असते.
७. स्वभावदोष
‘मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटणे , अव्यवस्थितपणा, नामजप करायचा आळस
‘हे गुरुमाऊली, पूजाला तुम्हाला अपेक्षित असे तुम्हीच घडवून घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना.’
– सौ. रूपा महेश सोलंकी (पूजाची आई), ठाणे (१०.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |