पोलीस करणार अन्वेषण !
पुणे – येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचा किती हात आहे ? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने पालटले ? अग्रवाल पती-पत्नीने कुणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेंशी संपर्क साधला ? विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांच्याशी कशा प्रकारे आर्थिक व्यवहार केला ? अग्रवाल यांनी कुणाच्या साहाय्याने अतुल घटकांबळे यांना ३ लाख रुपये दिले ? पसार असतांना शिवानी अग्रवाल कुठे होत्या ? अशा अनेक सूत्रांची पोलीस अन्वेषण करणार असून त्या अनुषंगाने अग्रवाल पती-पत्नीला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे समोर आले आहे. विशाल अग्रवाल यांनी ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला २ संशयित व्यक्तींच्या साहाय्याने ३ लाख रुपये दिले, त्या व्यक्ती नेमक्या कोण ? याचे अन्वेषण करण्यात येणार आहे.