मुंबई – येथील आय.ए.एस्. अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिक रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगी (वय २६ वर्षे) हिने पहाटे ४ वाजता इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रस्तोगी कुटुंब मंत्रालयाच्या समोरील इमारतीमध्ये रहाते. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत.
या प्रकरणी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात तिने म्हटले होते, ‘माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही उत्तरदायी धरू नये. अभ्यासात ज्या प्रकारे प्रगती करायची होती, ती होत नव्हती, यश प्राप्त होत नव्हते; म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले आहे.’’
लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी हुशार नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत कि नाही, अशी भीती तिला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा चालू आहे.