शनिवारवाड्यामध्ये ‘बाँब’ ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी बीड येथून एकास अटक !

शनिवारवाडा

पुणे – येथील शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये बाँब ठेवल्याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. शोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘कॉल’वरून तांत्रिक माहिती घेऊन बीड जिल्ह्यातील चिंचपूर येथे रहाणार्‍या रामहरि सातपुते याला कह्यात घेतले आहे. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई राकेश गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.  पुणे नियंत्रण कक्षास ‘शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये’ बाँब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाँबशोधक पथकाने घटनास्थळाची पहाणी केली.