महाराष्ट्रातील मतदानात ३१ लाख ६८ सहस्र ३८९ एवढी वाढ !

मुंबई – वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रात ५ कोटी ३८ लाख ३८ सहस्र ३८९ म्हणजे ६०.७१ टक्के इतके मतदान झाले होते. यावर्षी महाराष्ट्रात लोकसभेसाठी ५ टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानामध्ये एकूण ५ कोटी ७० लाख ६ सहस्र ७७८ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ कोटी ६ लाख ५६ सहस्र ६११ इतके पुरुष, २ कोटी ६३ लाख ४८ सहस्र ७१७ महिला, तर अन्य १ सहस्र ४५० जणांचा सहभाग होता. या मतदानाची टक्केवारी ६१.३३ टक्के इतकी आहे, म्हणजे वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानात ०.६२ टक्के इतकी वाढ झाली.