अपयश आले, तरी ईश्वराच्या मार्गावर पाऊल परत परत पुढे ठेवा !

‘धाडसी बना. धैर्य सोडू नका. सहस्र वेळा अयशस्वी झाला, तरीही ईश्वराच्या मार्गावर एक पाऊल पुढे ठेवा, पुनश्च ठेवा, परत ठेवा, यश अवश्य मिळेल. ‘संशयात्मा विनश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ४०) म्हणजे ‘संशयी मनुष्याचा नाश होतो’ किंवा ‘संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो’; म्हणून संशय काढून टाका.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)