‘श्रीमन्नारायणाचा अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सप्तर्षींचे त्रिवार वंदन ! ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या समवेत पांडव होते, श्रीरामाच्या समवेत वानर होते, त्याप्रमाणे आता गुरुदेवांच्या समवेत सनातनचे साधक आहेत. श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या चार गुरूंच्या नंतर आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं परब्रह्मस्वरूप आहेत. प्रत्येक अवतारामध्ये नाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षी तुमच्या समवेत होते. श्रीकृष्णाच्या समवेत सुदामा होता, तसे आम्ही सप्तर्षी गुरुदेवांच्या समवेत आलो आहोत.’
(सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४५ (१७.५.२०२०))
परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान असणे
‘श्रीविष्णूने त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात क्षत्रिय कुळात जन्म घेतला आणि द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या रूपात यादव कुळात जन्म घेतला. आताच्या कलियुगात श्रीविष्णूने ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांच्या रूपात जन्म घेतला आहे. सध्या गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) संपूर्ण पृथ्वीच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान आहेत. साक्षात् भगवंत पृथ्वीवर आला, तर तो कसा दिसेल ? तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांच्यासारखाच दिसेल.
(सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४६ (१.६.२०२०))