पुणे विद्यापिठातील स्त्रीलंपट एन्.एस्.यू.आय. अध्यक्षावर कारवाई करावी !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पुणे सचिवांना निवेदनाद्वारे मागणी !

पुणे – येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये नॅशनल काँग्रेस पार्टीची विद्यार्थी संघटना म्हणजेच ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’ या संघटनेची काही चुकीची कृत्ये उघडकीस आली आहेत. पुणे विद्यापीठ एन्.एस्.यु.आय. अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हेही प्रविष्ट केले आहेत. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.