सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मक्षेत्रात केलेले कार्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’च्या माध्यमातून स्वतः केलेले कार्य

‘उठा राष्ट्रवीर हो, धर्मवीर हो…’, हे रणशिंग फुंकण्यासाठी सभास्थळी येत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (वर्ष १९९७)

१. सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना

वर्ष १९९१ मध्ये नाशिक येथे वास्तव्यास असतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘अध्यात्माचे शिक्षण आणि प्रसार यांचे कार्य ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ या नावाखाली करा.’’ त्यानुसार परात्पर गुरु डॉक्टरांनी १.८.१९९१ या दिवशी सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना केली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुंबई येथील चिकित्सालय ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’चा पहिला आश्रम आणि अध्यात्मप्रसाराचे मुख्य केंद्र बनणे ।

‘अध्यात्मात उन्नती करण्यासाठी तन-मन-धनाचा त्याग करणे आवश्यक असते’, हे तत्त्व लक्षात आल्यानंतर वर्ष १९९३ मध्ये मी मुंबई येथील माझ्या चिकित्सालयाची ३ खोल्यांची जागा माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांना अर्पण केली. तेव्हापासून सनातनच्या कार्यासाठी पूर्णवेळ देणारे साधक तेथे निवास करू लागले.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.३.२०१७)

३. सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य

सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत अध्यात्माचे अभ्यासवर्ग आयोजित करणे, प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करणे, अध्यात्माचे शिक्षण देणार्‍या ग्रंथांचे संकलन करणे, तसेच जिज्ञासू अन् साधक यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी साहाय्य करणे, हे कार्य केले. वर्ष १९९६ ते वर्ष १९९८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांत ‘साधना आणि क्षात्रधर्म’ या विषयावर शेकडो सार्वजनिक (जाहीर) सभा घेतल्या. या सभांमुळे सहस्रो जिज्ञासू आणि शेकडो साधक संस्थेशी जोडले गेले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून स्वतः केलेले कार्य

(डावीकडून) वारकरी संप्रदायाचे प.पू. यादव महाराज, प.पू. तोडकर महाराज, करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती, प.पू. प्रज्ञानंदस्वामी, प.पू. मुंगळे महाराज, प.पू. विजयेंद्र महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले ( वर्ष २००१)

अध्यात्मप्रसाराच्या कार्याची व्याप्ती वाढल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २३.३.१९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली.

१. सनातन संस्थेचे उद्देश

अ. भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी विविध योगमार्गांतील साधकांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे

आ. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करून धर्मशिक्षण देणे

इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समविचारी संस्थांसह हिंदूसंघटन अन् सांप्रदायिक ऐक्य यांसाठी प्रयत्न करणे

२. सनातन संस्थेचे कार्य

१. सत्संग : जिज्ञासूंना साधनेचे महत्त्व सांगणे आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या सिद्धांतानुसार प्रत्येकाला साधना शिकवणे, यासाठी ठिकठिकाणी साप्ताहिक सत्संग आयोजित केले जातात. बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, स्वभावदोष-निर्मूलन सत्संग, भाववृद्धी सत्संग असे सत्संगांचे प्रकार आहेत.

२. व्याख्याने : आनंदी जीवनासाठी अध्यात्म, व्यक्तीमत्त्व विकास, तणावमुक्तीसाठी अध्यात्म आदी विषयांवर सनातन संस्थेद्वारे विनामूल्य व्याख्याने घेतली जातात.

३. गुरुपौर्णिमा : गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगण्यासाठी सनातन संस्था देशभरात प्रतिवर्षी २०० हून अधिक ‘गुरुपौर्णिमा सोहळे’ आयोजित करते.

४. कुंभमेळ्यांमध्ये अध्यात्मप्रसार : सनातन संस्थेने प्रयाग (वर्ष २००१ आणि वर्ष २०१३), नाशिक (वर्ष २००३ आणि वर्ष २०१५), उज्जैन (वर्ष २००४ आणि वर्ष २०१६) आणि हरिद्वार (वर्ष २०१०) येथील कुंभमेळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अध्यात्मप्रसार केला. तसेच कुंभक्षेत्रे, मंदिरे आणि तीर्थ यांचे पावित्र्यरक्षण, भोंदूबाबांविरुद्ध वैध कृती करणे, धर्महानी रोखणे आदी विषयांवर धर्मजागृतीही केली.

५. दूरचित्रवाहिन्यांवरून हिंदु धर्माची बाजू मांडणे : सनातन संस्थेच्या वाढत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यामुळे देशभरातील विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांच्या संदर्भात हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी संस्थेच्या प्रवक्त्यांना दूरचित्रवाहिन्यांकडून सातत्याने आमंत्रणे दिली जात आहेत.

५ अ. वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे : दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये हिंदु धर्माच्या प्रवक्त्यांची न्यूनता लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातन संस्था वर्ष २०१५ पासून ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करत आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून हिंदु धर्माची बाजू मांडणारे ४० प्रवक्ते सिद्ध झाले आहेत.

५ आ. सनातन संस्थेचे संकेतस्थळ – Sanatan.org : शास्त्रीय परिभाषेत अध्यात्माचा प्रसार करणे, धार्मिक कृतींमागील शास्त्र सांगणे आणि साधनेविषयी शंकानिरसन करणे हे या संकेतस्थळाचे प्रमुख उद्देश आहेत. प्रतिमाह १ लक्षांहून अधिक वाचकसंख्या असलेले हे संकेतस्थळ मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी या पाच भाषांत कार्यरत असून ते १८० हून अधिक देशांत पाहिले जाते.

Sanatan.org

SanatanShop.com

भ्र.ध्व. ९३२२३१५३१७ 


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती करणे

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी ईश्वरप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेविना गत्यंतर नाही. यासाठीच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.

१. गुरुकृपायोगाची आठ अंगे

१. स्वभावदोष-निर्मूलन, २ अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भक्तीभाव जागृत करण्यासाठी प्रयत्न, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (निरपेक्ष प्रेम)

(अधिक विवेचनासाठी वाचा – ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोग’)

२. साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे बीजारोपण करणे

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. आज परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे ध्येय ठेवून काही साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, नाट्यशास्त्र आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे.

३. साधकांची होत असलेली शीघ्र आध्यात्मिक उन्नती !

बरेच संत आणि गुरु यांच्याकडे त्यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी एकही शिष्य नसतो. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे गुरुकृपायोगानुसार साधना करून १५.५.२०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले, तर १,०५८ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.

(सर्व लिखाणासाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय कार्य : खंड १’)


गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमवेत दास्यभावात खाली बसलेले शिष्य डॉ. जयंत आठवले (वर्ष १९९३)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘संमोहन उपचारांनी सुधारणा होऊ न शकणारे मनोरुग्ण संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर बरे होतात’, असा अनुभव आला. त्यानंतर ‘केवळ स्वभावदोष आणि अहं हेच सर्व मनोविकारांचे मूळ कारण नसते, तर ‘प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास’ ही अध्यात्मातील कारणेही अतिशय महत्त्वाची आहेत’, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत त्यांनी अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ २५ संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.


अध्यात्मप्रसाराचे कार्य

सुप्रसिद्ध ‘वसंत व्याख्यानमाले’त ‘अध्यात्म आणि साधना’ या विषयावर व्याख्यान देतांना प.पू. डॉक्टर (वर्ष १९९३)

‘जीवनातील अत्युच्च आनंद देणारे ‘अध्यात्मशास्त्र’ हे वैद्यकीय शास्त्रापेक्षा उच्च प्रतीचे शास्त्र आहे’, याची प्रचीती घेतल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राचा प्रसार आरंभला. वर्ष १९८३ ते १९८७ या काळात विविध संतांकडून अध्यात्म शिकत असतांना ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’, या उक्तीनुसार ते त्यांच्याकडे मनोिवकारांवरील उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व सांगून साधना सांगू लागले आणि डॉक्टरांसाठी आयोजित व्याख्यानांमधूनही ‘संमोहनशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र’ हा विषय मांडू लागले. पुढे वर्ष १९९४ मध्ये त्यांनी अध्यात्मप्रसाराचे कार्य पूर्णवेळ करण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय पूर्णपणे बंद केला.