(‘ल्युकोपोर’ म्हणजे ‘जखमेवर केलेले बँडेज’ चिकटवण्यासाठी, तसेच अन्य काही वैद्यकीय उपचार करतांना वापरण्यात येणारी कागदी चिकटपट्टी [मेडिकल टेप])
‘मला २६.८.२०२३ या दिवशी संतांनी वापरलेल्या ‘ल्युकोपोर’चे काही तुकडे आध्यात्मिक लाभ होण्यासाठी मिळाले. त्यातील एक तुकडा मी माझ्या आज्ञाचक्रावर लावला. हे मी विसरून गेलो. नंतर नामजप करायला बसल्यावर मी आज्ञाचक्रावर न्यास केला. तेव्हा अन्य दिवसांच्या तुलनेत माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण जलद गतीने न्यून झाले. मला प्रथम आश्चर्य वाटले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘संतांनी वापरलेल्या ‘ल्युकोपोर’चा तुकडा मी आज्ञाचक्रावर लावला होता. त्यामुळे आवरण जलद गतीने न्यून होत आहे.’
‘भगवन् (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपण करत असलेल्या संशोधनामुळे आम्हाला अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण होण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या कृपेमुळे आमचा आध्यात्मिक त्रास न्यून होत आहे, यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘भगवन्, आपण दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करता येऊन आमच्या जीवनाचे कल्याण व्हावे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (२९.८.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक