एका शिबिराच्या वेळी साधकाला संतांची सेवा करतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘एकदा एका शिबिराच्या निमित्त आश्रमात धर्मप्रचारक संत आणि सद्गुरु आले होते. त्यांची सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. शंकर नरुटे

१. संतांना साधकांना पुढे घेऊन जाण्याचा असलेला ध्यास !

१ अ. संत साधकांच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्यांना योग्य दिशा देत असणे : संतांना समष्टीला पुढे नेण्याची तळमळ असल्यामुळे साधकांची साधना होते. संत साधकांना साधनेत पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि धर्मकार्य सुरळीत चालण्याच्या दृष्टीने एकत्रित चर्चा करून शिबिरात आलेल्या प्रत्येक साधकाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करत होते. संतांच्या मार्गदर्शनामुळे साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती होते. संतांचा संकल्प साधकांसाठी अधिक प्रमाणात कार्यरत होतो. ‘साधक त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधनेत कुठे थांबले आहेत ? त्यांना कसे पुढे न्यायला हवे ?’, याचा अभ्यास करून संत साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी विचार करतात.

१ आ. संत साधकांना समष्टी भगवंताशी एकरूप होण्यासाठी दिशा देत असणे : सनातनचे समष्टी संत समष्टी कल्याणाचा ध्यास घेऊन समष्टी सेवा करतात. ते साधकांना समष्टीचा ध्यास लावून समष्टी भगवंताशी एकरूप होण्यासाठी दिशा देतात. आपण संतांची स्थुलातून वेगळी सेवा करू शकत नाही. संतसेवा म्हणजे संतांना अपेक्षित अशी व्यष्टी साधना आणि समष्टी साधना केल्याने त्यांची कृपा संपादन होते.

१ इ. संतांच्या अस्तित्वामुळे साधकांना होत असलेला लाभ : संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होतात.  संतांकडे पाहून साधकांचे मन प्रसन्न होऊन त्यांना स्वतःचा विसर पडतो. तेव्हा आपण देहभान विसरून सेवा करतो.

१ ई. साधकांनी कृतज्ञताभावात रहाणे आवश्यक : साधकांनी व्यष्टी साधनेची जोड देऊन समष्टी सेवा केल्यावर संतांना आनंद होतो. तेव्हा संत साधकांचे कौतुक करतात. त्यांनी केलेले कौतुक, म्हणजे साधकांवर झालेली कृपाच असते. साधक कृतज्ञताभावात राहिल्यास त्यांची साधनेत प्रगती होत जाते.

१ उ. ‘सर्वत्रच्या साधकांना साधनेची दिशा मिळावी आणि गुरुकार्य गतीने व्हावे’, या दृष्टीने भगवंताने शिबिर आयोजित केले होते.

२. धर्माचे बीज रोवणारे सनातनचे संत 

धर्माचे बीज रोवणारे सनातनचे संत हे ऋषिमुनीच आहेत. ‘धर्मसंस्थापना व्हावी, साधकांची साधना व्हावी आणि समाजाची ऐहिक अन् पारमार्थिक उन्नती व्हावी’, यांसाठी गुरुमाऊलींनी अनेक संतरत्ने घडवली आहेत. आज हे मोठे धर्मकार्य गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) या टप्प्याला आणले आहे.

३. ‘संत ईश्वराचे सगुण रूप असून ते एकमेकांशी एकरूप असतात’, याची मला प्रचीती आली.

४. सनातन संस्थेत संतांची मांदियाळी होऊन मोठ्या प्रमाणात धर्मकार्य होत आहे आणि हा ईश्वरी राज्याचा आरंभ आहे.’

– श्री. शंकर राजाराम नरूटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक