Lok Sabha Elections Phase 5 : पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान !

नवी देहली – लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले. यांमध्ये लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशा यांचा समावेश आहे. देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यात बंगाल राज्यात सर्वाधिक, म्हणजे ७३ टक्क्यांहून अधिक, तर महाराष्ट्रात सर्वांत अल्प, म्हणजेच ४९ टक्केच मतदान झाले.