|
एटा (उत्तरप्रदेश) – येथे राजन सिंह नावाच्या एका व्यक्तीने ८ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Uttar Pradesh Police arrest young voter for casting votes multiple times in Etah district after Video goes viral
All the members of the polling party at the booth suspended.
Re-polling ordered at the booth#5thPhase #LokSabha2024Electionspic.twitter.com/8nmZtQOfHy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2024
यासह मतदान केंद्रावरील सर्व कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. या व्यक्तीने स्वतःच या संदर्भात एक व्हिडिओही बनवला होता, जो सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.