Income tax raids in agra : आगरा (उत्तरप्रदेश) येथे बूट विक्री करणार्‍या दुकानांवर आयकर खात्याची धाड

३० कोटी रुपयांची रोकड जप्त

आयकर विभागाकडून जप्त केलेली रोख रक्कम

आगरा (उत्तरप्रदेश) – आयकर विभागाकडून येथे १८ मे या दिवशी व्ही.के. शूज, मंशु फूटवेअर आणि हरमिलाप फूटवेअर या दुकानांवर ही धाड घालण्यात आली. या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.