Congress Suppressed Neha’s Murder:नेहाच्या हत्येचे प्रकरण दाबून टाकण्यात आले !

नेहा हिरेमठचे वडील आणि काँग्रेसचे हुब्बळ्ळी येथील नगरसेवक निरंजन यांचा गंभीर आरोप !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात हत्या झालेली विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या पाठोपाठ एकतर्फी प्रेमातून अंजली अंबिगेर या युवतीच्या मृत्यूमुळे संपूर्ण हुब्बळ्ळी शहर शोक सागरात बुडाले आहे. मृत अंजली हिच्या प्रभागाचे नगरसेवक असलेले आणि लव्ह जिहादमुळे हत्या झालेल्या नेहा हिरेमठचे वडील निरंजन हिरेमठ यांनी अंजलीच्या अंत्यविधीसाठी १ लाख रुपये देऊन तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. अंजलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले निरंजन हिरेमठ यांनी या वेळी गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, नेहाच्या हत्येचे प्रकरण दाबून टाकण्यात आले आहे. माझ्या मुलीची हत्या होऊन एक महिना उलटून गेला, तरी राज्याच्या गृहविभागाने मला एक दूरभाषही केला नाही. एवढेच नव्हे, तर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर हेही मला भेटायला घरी आलेले नाहीत.

यासंदर्भात पोलिसांची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने हुब्बळ्ळी-धारवाडच्या पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्याने त्यांच्याकडून या सूत्राविषयी माहिती मिळू शकेल. बेंगळुरू येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसची मुसलमानांना चुचकारण्याची खोड काही नवीन नाही. स्वपक्षाच्याच एका नगरसेवकावर अन्याय झाला होऊनही त्याचे काँग्रेसला कसेलच सुवेरसुतक नाही, हे जाणा !
  • कर्नाटकातील हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याचाच हा परिणाम आहे. अशा अनेक निष्पाप मुलींची नेहा हिरेमठ हिच्यासारखी अवस्था होण्याआधी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे !