अमेरिकेत ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक’च्या विरोधात हिंदु संघटना एकत्र : हिंदूविरोधी प्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप !

वॉशिंग्टन – ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’च्या विरोधात अमेरिकेतील हिंदु संघटना एकत्र आल्या आहेत. या हिंदु संघटनांनी आरोप केला आहे की, ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक’कडून भारतीय वंशाच्या अमेरिकन राजकारण्यांना विरोध करणार्‍या लोकांना त्यांच्या परिषदेत वक्ते आणि पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ची दोन दिवसीय वार्षिक परिषद नुकतीच चालू झाली आहे.

१. ‘डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’ ही भारतीय अमेरिकन समुदायाची सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून उदयास आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन दीपक राज हे त्याचे सह-संस्थापक आणि सर्वांत मोठे देणगीदार आहेत.

२. हिंदु संघटनांनी नुकतेच एक निवेदन प्रसारित करून म्हटले की, भारतीय वंशाचे अमेरिकन उमेदवार आणि निवडून आलेले अधिकारी यांच्यावर उघडपणे टीका करणार्‍या लोकांना परिषदेत आमंत्रित करणे, अत्यंत निराशाजनक आहे.

३. परिषदेला अशा संघटनांना आमंत्रित केले आहे, जे भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना उघडपणे विरोध करतात आणि हिंदुविरोधी कट्टरतेला प्रोत्साहन देतात.