‘आम्ही त्या ऋषिमुनींना धन्यवाद देतो, ज्यांनी दीपावलीसारख्या सणांचे आयोजन करून मानवाला मानवाजवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाने माणसांमध्ये परस्पर खेळीमेळीने रहाण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाच्या सुषुप्त शक्ती जागृत करण्याचा संदेश दिला आहे. जीवात्म्याने परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी विविध उपाय शोधून समाजात, गावागावांत, घराघरांत हा संदेश पोचवण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी पुरुषार्थ केला आहे. त्या महापुरुषांना आज आम्ही सहस्र वेळा प्रणाम करतो.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)