‘भगवान श्रीकृष्णाने युद्धसमयी अर्जुनास सांगितलेली ‘भगवद्गीता’ आणि पितामह भीष्म यांनी मृत्यूशय्येवर असतांना युधिष्ठिरास केलेले ‘विष्णुसहस्रनामा’चे निरूपण हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. विष्णुसहस्रनाम सृष्टीच्या अस्तित्वामागचे रहस्य सांगते, तर भगवद्गीता व्यवहारज्ञान शिकवते. भूतकाळ हाच भविष्यकाळाचा आधार असतो. महाभारत हा जर महर्षि व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे इतिहास असेल, तर त्यातही काही भविष्यकाळाची पावले शोधणे अवघड जाणार नाही; म्हणून महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र याच दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कलियुगाच्या अंतकाळी समाज कोणत्या स्तरावर पोचणार आहे, याचे अडीच सहस्र वर्षांपूर्वी बांधलेले अंदाज आणि आजची परिस्थिती यांच्यातील विलक्षण साम्य स्पष्ट दिसते.’
– श्री. म.ग. काळे
(साभार : मासिक, ‘प्रसाद’, जानेवारी २००९)